सेलू ( प्रतिनिधी )
येथील अखिल भारतीय सेलू तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास अभिवादन व विशेष गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .
शहरातील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात सकाळी १० वाजता संपन्न होणाऱ्या या अभिवादन व सत्कार सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून सेलू नगरीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद सावंत हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ संजय रोडगे ,सेलू नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम,सेलूचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांची उपस्थिती राहणार आहे .
या कार्यक्रमात शहरातील जेष्ठ पत्रकार डी व्ही मुळे ,कांचन कोरडे ,नारायण पाटील ,राम सोनवणे व सय्यद इसाकोद्दीन हाशमी यांचा तसेच ऊन ,पाऊस ,वारा याची तमा न बाळगता शहरात घरोघरी जाऊन वृत्तपत्र वाटप करणारे वृत्तपत्र विक्रेते पुनमचंद खोना यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात येणार आहे .
तरी या अभिवादन व सन्मान सोहळ्यासाठी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठी पत्रकार संघटनेचे परभणी जिल्हा सरचिटणीस महंमद इलियास , सेलू तालुका अध्यक्ष लक्ष्मण बागल ,तालुका सरचिटणीस मोहसीन अहेमद तसेच संघाच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी केले आहे .
Shabdraj www.shabdraj.com