09/05/26
Breaking News

इंदिरा गांधी महाविद्यालयात शाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी

पूर्णा / प्रतिनिधी – इंदिरा गांधी महाविद्यालयामध्ये शाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य धम्मानंद खंदारे यांनी साहित्यसम्राट अण्णा साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

महाविद्यालयाचे प्राध्यापक विष्णू गीते, जगदीश गोरे, महादेव रेनगडे, राहुल हंबर्डे, केदार जनकवाडे , सुशिल दळवी, प्रशांत वावळे,अर्चना कराळे, व सर्व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या व्यक्तिमत्व आजच्या विदयार्थ्यांसाठी किती प्रेरणादायी आहे त्यांचे विपुल साहित्य समाजाच्या विकासासाठी फार मोलाचे स्थान आहे. याप्रसंगी धम्मानंद खंदारे व जगदीश गोरे यांनी शाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे आभार राहुल हंबर्डे यांनी व्यक्त केले.

Check Also

एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा वर्षपूर्ती ‘संकल्प सप्ताह’ साजरा

​हिंगोली,दि 07 ः हिंगोली जिल्ह्याला थॅलेसेमियामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. ‘एक पाऊल थॅलेसेमिया …