परभणी / प्रतिनिधी – श्री शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी तर्फे दिनांक २५/०७/२०२५ रोजी विधी तृतीय व बी. ए. एल. एल. बी. पाचवे वर्षातील विध्यार्थ्यांसाठी Land Laws व Environmental Law या विषयासंदर्भात संरक्षित वन व जमीन अधिग्रहण कायदा प्रत्यक्षात विध्यार्थ्यांना कळावा यासाठी Field Visit औंढा नागनाथ या परिक्षेत्रात आयोजित करण्यात आली. या प्रसंगी श्रीमती एस. बी. कीर्तनकार मॅडम, वनपाल औंढा व श्री. चोपडे, वनरक्षक, औंढा. यांनी संरक्षित वन व घनवन याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. सदर Study Tour मध्ये ५१ विध्यार्थी सहभागी झाले.
तसेच जमीन अधिग्रहण कायद्यासंदर्भात LIGO आंतरराष्ट्रीय प्रकल्पास सर्व विध्यार्थी व प्राध्यापकांनी भेट दिली. या प्रकल्पाचे अधिकारी श्री. सागर भूवर यांनी याविषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन करून विध्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. याप्रसंगी दुधाळा गावचे सरपंच श्री जगदीप दिपके यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
या शैक्षणिक Study Tour चे आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. एम. एल. धर्मापुरीकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करिता म शि प्र मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष मा. प्रकाश सोळंके, सरचिटणीस मा. सतीश चव्हाण तसेच महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य मा. श्री चंद्रशेखर नखाते, मा. श्री. गोविंद कदम, मा. श्री मकदुम मोहिउद्दिन, मा. श्री. संतोष बोबडे, मा. ॲड. दिपक देशमुख, मा. ॲड. अशोक शिंदे व मा. श्री. संतोष इंगळे आदींनी अभिनंदन केले. या Study Tour च्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. ज्ञानेंद्र फुलझळके, डॉ. के. एस. नेहरकर, डॉ. अनिता देशमुख व डॉ. विद्या इंगोले यांचे सहकार्य लाभले.
Shabdraj www.shabdraj.com