01/03/26
Breaking News

सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,सेलूतील शिवजन्मोत्सव सोहळा समितीचा उपक्रम

सेलू ( प्रतिनिधी )
येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्त नूतन विद्यालय व नूतन प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा ( वर्षे दुसरे )इयत्ता चौथी ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रविवार ( दि. १५ ) रोजी संपन्न झाली. तीन गटात संपन्न झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज सामन्यज्ञान स्पर्धा परीक्षेस तालुक्यातील २२०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. परीक्षा केंद्रास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा सामुहिक जिजाऊ वंदना, राष्ट्रगीत, राज्यगीतानंतर सुरू झाली. प्रास्ताविक रामराव गायकवाड यांनी केले. सुत्रसंचलन सुभाष मोहकरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन रामराव बोबडे यांनी केले. तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा यशस्वीतेसाठी सर्जेराव लहाने, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक शंकर बोधनापोड , मुख्याध्यापक उल्हास पांडे, सच्चिदानंद डाखोरे, प्रा. विलास खरात, किरण जाधव, प्रशांत देशमुख, डॉ . शरद ठाकर, गणेश माळवे, प्रशांत नाईक, माधव गव्हाणे, बाबासाहेब पावडे, किरण खरात, साधना खरात, सर्जेराव सोळंके, आत्माराम हरकळ, तानाजी भोसले, संतोष पडोळे, प्रविण खंदारे, डॉ.काशिनाथ पल्लेवाड आणि सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा संयोजन समितीच्या सदस्य व तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

Check Also

पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार ?

देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे. पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी …