सेलू ( प्रतिनिधी)
सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या महत्त्वाच्या बस स्थानकावर लहान मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढले आहे. अनेक जणांनी आपले दागिने व रोख रक्कम यामध्ये गमावले आहे.
तसेच या बस स्थानकावरून हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनी देखील दररोज मोठ्या संख्येने ये-जा करतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. परभणी जिल्ह्यातील बाकी सर्व बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. फक्त सेलू बस स्थानकावर सीसीटीव्हीची व्यवस्था बाकी आहे तरी तात्काळ सेलू बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे व चोऱ्या चपाट्यांमुळे लोकांचे जे नुकसान होत आहे ती रोखावे. नसता येत्या पंधरा दिवसात श्री वेंकटेश्वर प्रतिष्ठान, सेलू च्या वतीने सेलू बस स्थानकावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा व्यंकटेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने विभाग नियंत्रकाकडे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी जयसिंग शेळके, विनोद धापसे, गणेश शेवाळे, नवनाथ गायकवाड, समर्थ झमकडे, संजय जाधव, प्रशांत कटारे आदीची उपस्थिती होती .
Shabdraj www.shabdraj.com