परभणी – शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, दिव्यांगांना सहा हजार मानधन व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी दिनांक २४ जुलै २०२५ रोजी राज्यभर होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाची पूर्वतयारी करण्यासाठी आज परभणी येथील शासकीय विश्रामगृहावर सर्वपक्षीय नियोजन बैठक पार पडली.
संपूर्ण राज्यासह परभणी जिल्ह्यातील एकूण सात ठिकाणासह परभणी शहरालगत असलेल्या एमआयडीसी गेटवरील शासकीय दुध डेअरी समोरील वसमत रोडवर सकाळी ११ ते १ या कालावधीत होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाची दिशा आणि नियोजन या बैठकीमध्ये करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये या चक्काजाम आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग व्हावा यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी बैठका घेतल्या असून शेतकऱ्यांचा या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील दिव्यांग व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचाही या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग असणार आहे.
आज झालेल्या नियोजन बैठकीचे प्रास्ताविक प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवसेना उबाठाचे किसान सेना जिल्हा उपाध्यक्ष उमेश देशमुख यांनी केले.
२४ जुलै २०२५ रोजी होणारा चक्काजाम आंदोलन हे शेतकऱ्यांचे ऐतिहासिक आंदोलन असेल व यासाठी सर्वांनी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून हे आंदोलन सर्वव्यापी कसे ठरेल यासाठी प्रयत्न करण्याची या बैठकीत ठरले. या सर्वपक्षीय समन्वय समितीच्या बैठकीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस ऍड.माधुरीताई क्षिरसागर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा जिल्हा अध्यक्ष अमोल जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन आवरगंड, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव वैजनाथ देवकते, भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभा जिल्हाध्यक्ष शिवाजी कदम, मराठा सेवा मंडळाचे संस्थापक नितीन देशमुख मराठा सेवा मंडळ अध्यक्ष, संभाजी ब्रिगेडचे गजानन जोगदंड, कृषी परिषदेचे प्रदेश सचिव एकनाथ मोरे, राष्ट्रीय काँग्रेसचे मीडिया प्रभारी सुहास पंडित, छावा दल जिल्हाप्रमुख रामदास अवचार, शिवमुद्रा संघटना जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोगल, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख उद्धव गरुड, केशव जाधव, शंकर दामोदर, संदीप गव्हाणे, रमेश देशमुख, स्वप्नील गरुड विष्णू लोढे, अंकुश पोंढे, सुरेश लोहट, गजानन शहाणे, नवनाथ देशमुख यांच्यासह विविध पक्षाचे व संघटनांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com