04/02/26
Breaking News

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कथाकथन, स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाचा उपक्रम

सेलू ( प्रतिनिधी )
येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मंगळवार ( दि. २७ ) कथाकथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कथाकार डॉ. राजाराम झोडगे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रमेश बोराडे, ज्येष्ठ कवी धोंडोपंत मानवतकर यांची उपस्थिती होती. डॉ. रमेश बोराडे यांनी ‘ माझ्या मेव्हूण्याचं लगीन ‘ ही विनोदी धाटणीची कथा सादर करताना श्रोत्यांना पोटधरून हसायला भाग पाडले . अतिशय ग्रामीण बोलीभाषेत कथा सादरीकरण करताना श्रोत्यांना आपल्या कथेत गुंतवून ठेवले. तर डॉ. राजाराम झोडगे यांनी वास्तवाचं भान देणारी ‘ बोळवण ‘ कथा सादरीकरण करताना श्रोत्यांना भावनिक आणि कौटुंबिक रितीरिवाजाच्या जोखडातून बाहेर पडले पाहिजे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली असताना रितीरिवाज बागुलबुवा उभा करून कर्जबाजारी होण्यासाठी प्रवृत्त करणे धोकादायक आहे. भावनिक कथेची मांडणी करताना श्रोत्यांच्या ह्रदयाला पाझर फोडला . कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून धोंडोपंत मानवतकर यांनी कविता
सादरीकरण केले . कार्यक्रमात ग्रंथालयाच्या वतीने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील यशाबद्दल नूतन विद्यालयातील सहशिक्षक डॉ. सुरेश हिवाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक ग्रंथालयाचे सचिव चंद्रशेखर मुळावेकर यांनी केले. सुत्रसंचलन कथाकार भगवान कुलकर्णी यांनी केले. तर आभार प्रदर्शन कवी डॉ. अशोक पाठक यांनी केले. कार्यक्रमास ग्रंथालयाचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी,एक.टी. देशमुख, आप्पासाहेब गाडेकर, दादासाहेब बोंबले, प्रा.मकरंद बोठे, लक्ष्मण गाडेकर, हरिहर खिरे, रामराव गायकवाड, गंगाधर गुंजकर, इत्यादी.
यांची उपस्थिती होती.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …