पाथरी / प्रतिनिधि – पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी जिमेदारीचे भान ठेउन समाजात वागले पाहिजे .आपण मोठे झाल्यानंतर ज्यांच्या सहकार्याने आपण ईथपर्यंत आलो त्यांना कधी विसरू नका तसेच विद्यार्थ्यानी चारीत्रसंपन्न बनले पाहिजे असे आवाहन पाथरी येथील स्व.नितीन महाविद्यालयात दि. 30 जुन रोजी 27वा दिक्षांत समारंभात डाॅ .मल्लिकार्जुन करजगी बोलत होते .
पाथरी येथील स्व. नितीन महाविद्यालयातील या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राम फुन्ने हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. मल्लिकार्जुन करजगी (संचालक, रा. से . यो.विभाग,स्वा. रा. ती. म. विद्यापीठ नांदेड) तर संदीप भैय्या लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विज्ञान ,वाणिज्य ,व कला शाखेतील पदवी प्राप्त विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते पदवीचे वितरण करण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीक्षा विभाग प्रमुख डॉ.अर्चना बदने यांनी केले.तर प्राचार्य डॉ.राम फून्ने यांनी अध्यक्षीय समारोप केला.
यावेळी डॉ.मोरे जी.जे.,डॉ.इंजेगावकर ए. जी.,डॉ.बोचरे जे.एम.,डॉ.सोळंके ए. ए.आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.काळे टी. एफ. यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Shabdraj www.shabdraj.com