04/02/26
Breaking News

कब्बडी स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाचे यश

परभणी,दि 21 ः
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि योगानंद महाविद्यालय, वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या अंतर महाविद्यालयीन कबड्डी (मुले) स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवून यशाचा परंपरा कायम ठेवली आहे.
सदरील स्पर्धेत एकूण अकरा संघांनी सहभाग घेतला होता.श्री शिवाजी महाविद्यालयाने बहिर्जी महाविद्यालयाचा पराभव करून हा विजय मिळवला. या संघात कर्णधार आकाश कांबळे, ज्ञानेश्वर भुसारे, आत्मलिंग गलांडे, सौरभ गव्हाणे, भागवत पंढरे, श्रीकांत सूर्यवंशी, मंथन गायकवाड, धम्मपाल बोधम , ओमकार पवार, जय कदम, अजित जाधव, फैयाज शेख या खेळाडूंचा समावेश होता. या संघास क्रीडा विभागप्रमुख डॉ. संतोष कोकीळ, प्रा.राजेसाहेब रेंगे, डॉ. खाजा अब्दुल खादीर यांचे मार्गदर्शन लाभले.
संघाच्या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रकाशराव सोळंके, सरचिटणीस आमदार सतीशराव चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ श्रीनिवास केशट्टी, डॉ. रोहिदास नितोंडे, प्राध्यापक तसेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …