04/02/26
Breaking News

शाश्वत विकास मानवासाठी उपकारक – प्राचार्य डॉ. बबन पवार

परभणी : येथील शारदा महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या अंतर्गत वनस्पती शास्त्र विभागाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बबन पवार तर प्रमुख अतिथी प्रा. डॉ. सचिन खडके यांची उपस्थिती होती तर यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अंजली शिंदे व प्रा. डॉ. दत्ता चामले उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. बबन पवार यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानववादावर सविस्तर मांडणी करत उपाध्याय यांनी मांडलेला शाश्वत विकास मानवासाठी उपकारक असल्याचे मत व्यक्त केले तर प्रमुख अतिथी प्रा. डॉ. सचिन खडके यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनकार्याचा सविस्तर परिचय करून दिला. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा चोपडे यांनी तर आभार प्रदर्शन मेहेर जबिन यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालय प्रमुख सुरेश जयपूरकर, चंद्रकांत जाधव, भगवान रिठाड, सुनंदा राजगुरू यांनी प्रयत्न केले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …