04/02/26
Breaking News

युनियन बँकेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

परभणी,दि 26 ः
परभणी शहरातील युनियन बँक शाखेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवार (दि.26) आंदोलन केल्याने कर्जप्रकरणे मंजुर झाली आहेत.

या बँकेला अनेक गाव दत्तक आहे. त्यातील वझुर ता.पूर्णा येथील गावातील शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावत नवीन पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत गेल्या जुन महिन्या पासुन शेतकरी संपुर्ण कागदपत्रे देऊन सुद्धा बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यायला तयार नाही. तेव्हा काही शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून बँकेचे तक्रार केली तेव्हा स्वाभिमानीचे पद अधिकारी बँकेत गेले तेव्हा फील्ड ऑफीसर व शाखा अधिकारी जाणीव पूर्वक पीक कर्जासाठी टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले. तेव्हा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा शाखा अधिकाऱ्याची खुर्ची ओढून बाहेर काढल्या वर बँकेच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्ती करत शेतकऱ्यांचे होल्ड व कर्जाचे प्रकरण फक्त एका तासात  त्यामध्ये ही कामे ताबडतोब करून देतो म्हटल्यावर स्वाभिमानीने खूर्ची परत करत आंदोलन मागे घेतले. यावेळी किशोर ढगे, रामप्रसाद गमे, माऊली शिंदे व वजुर गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …