04/02/26
Breaking News

टाटा टेक्नॉलॉजीचे सीआयआयआयटी (CIIIT) केंद्र परभणीत

परभणी, दि.८ – परभणी जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणारा सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग’ (Center for Invention, Innovation, Incubation and Training )(CIIIT) प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर असून,  या सुमारे ११५ कोटी रुपयांच्या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे ३,००० विद्यार्थ्यांना इंडस्ट्री ४.० युगाशी सुसंगत अत्याधुनिक तांत्रिक व उद्योगाभिमुख प्रशिक्षण मिळणार असून परभणीला कौशल्य विकासाच्या नकाशावर ठळक स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सीआयआयआयटीआय केंद्रामुळे परभणी आणि आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंडस्ट्री ४.० या साठी लागणारे कौशल्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेता येणार आहे, ज्यामुळे स्थानिक तरुणांची रोजगारक्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल.तरुणांनी “नोकरी शोधणारे” न राहता “नोकरी निर्माण करणारे” व्हावे, या उद्देशाने देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशनच्या माध्यमातून नवउद्योजकांना मार्गदर्शन, मेंटॉरशिप आणि आवश्यक पाठबळ देणारे विविध उपक्रम राबवले जात आहेत.सदर सीआयआयआयटीआय सेंटरला मंजुरी मिळविण्यासाठी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमणी,रजिस्ट्रार श्री. वेणीकर आणि परभणी अस्ट्रॉनोमिकल सोसायटी यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …