सेलू /प्रतिनिधी –
विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानत शिक्षकांनी त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करावेत.विध्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आदर असतो. विद्यार्थी हे अनुकरणीय असतात.नवनिर्मिती क्षमता व सृजनशीलता तसेच सकारात्मक दृष्टीकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी सदैव प्रयत्नशील असावे असे प्रतिपादन भा. शि.प्र.संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य यांनी विवेकानंद विद्यालय सेलू आयोजित सत्रांत (१५ ऑक्टोंबर) बैठकीत बोलताना केले.बैठकीच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ चौधरी,उपेंद्र बेल्लूरकर,करुणा कुलकर्णी,मु.अ.शंकर शितोळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
डॉ.हेमंत वैद्य पुढे बोलताना म्हणाले की ,शाळेचा इतिहास हा शिक्षकांच्या त्याग,समर्पण यावर लिहिला जातो.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण अध्यापनात करावा तसेच पालक संपर्क साधत विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवाव्यात.शाळेचा व समाजाची आंतरक्रिया घडवून आणावी.शिक्षकांनी कार्यकर्त्याची भूमिका निभवावी.मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करत अपेक्षित वर्तन बदल करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बैठकीच्या प्रारंभी विवेकानंद व माजी राष्ट्रपती,भारतरत्न डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.मूल्यमापन,स्पर्धा परीक्षा अहवाल, विविध विषय अहवाल,बालवाडी अहवाल यांचा या सत्राचा आलेख मांडण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन साळवे,प्रास्ताविक शंकर शितोळे,आभार करुणा कुलकर्णी यांनी मानले.
Shabdraj www.shabdraj.com