04/02/26
Breaking News

साधकाच्या अंतःकरणातील ग्रंथीचे समूळ उच्चाटन करून छेदन करणारा ग्रंथ म्हणजे भागवत ग्रंथ- नंदकुमार महाराज गोंदीकर

सेलू / प्रतिनिधी – साधकांच्या अंतकरणातील ग्रंथीचे समूळ उच्चाटन करून छेदन करणारा ग्रंथ म्हणजे भागवत ग्रंथ असून भगवंताच्या मुखातून जागृत अवस्थेत प्राप्त झालेले ज्ञान म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आहे . व जीवनातील व्यथा निवारण करणारी कथा म्हणजे भागवत कथा आहे .असे प्रतिपादन भागवताचार्य नंदकुमार महाराज गोंदीकर यांनी गुरुपौर्णिमेनिमित येथील शिष्य परिवाराच्या वतीने दत्त मंदिर मध्ये आयोजित भागवत ज्ञान यज्ञ सोहळ्यात निरूपण करतांना केले .

 

भागवत कथेच्या प्रारंभी येथील शेरे गल्ली मधील जगदंबा मंदिर मधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती .
यावेळी प्रवीण प्रदीपराव साळेगावकर व मनीषा प्रवीण साळेगावकर यांच्या हस्ते विधिवत स्थापित देवता व ग्रंथ पूजन करण्यात आले .यावेळी केशव महाराज दीक्षित यांनी पौरोहित्य केले .

यावेळी भागवत कथेचे महत्व सांगताना महाराज पुढे म्हणाले की ,केवळ गीता व भागवत या दोनच ग्रंथांना ” श्रीमद “ही उपाधी प्राप्त झाली आहे .व त्याच्या केवळ सात दिवसाच्या श्रवणाने राजा परीक्षितीचा उद्धार झाला .पूर्वपुण्य ज्याचे बलवत्तर असते त्यालाच परमार्थाची आवड होऊन त्यासाठी सवड मिळत असते .नसता प्रपंचासाठी केलेली धडपड तर निरर्थकच आहे .तशी धडपड जर परमार्थासाठी केली तर निश्चित मोक्ष प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही .नवविधा भक्तीतील प्रथम भक्ती श्रवण भक्ती असूनतीच भक्ती राजा परीक्षितीने केली होती .

 

यावेळी तबला साथ राम महाराज गायकवाड हे देत असून हार्मोनियम सिंक साथ अर्जुन महाराज जाधव देत आहे .महाराजांचे शिष्य महादेव वानरे हे यावेळी संगीत साथ देत आहेत .
९ जुलै रोजी या भागवत ग्रंथाची सांगता होणार असून संतोषराव दिग्रसकर यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत ग्रंथ पूजन व ग्रंथ मिरवणूक निघणार आहे .दत्त मंदिर पासून महाराजांची निवासव्यवस्था असलेल्या जयंतराव दिग्रसकर यांच्या घरापर्यंत ही मिरवणूक काढण्यात येणार आहे .

 

१० जुलै रोजी गुरुपौर्णिमा असल्यामुळे शिष्यपरिवाराच्या वतीने तसेच भाविक भक्तांच्या वतीने सदगुरु नंदकुमार महाराज गोंदीकर यांचे गुरुपूजन होणार आहे .वत्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे .तरी सर्व भाविक भक्तांनी कथाश्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …