परभणी,दि 27 ः
मनोज जरांगे पाटील मुंबईला येण्यासाठी आंतरवाली सराटीतून सकाळी १० वाजता निघाले आहेत. त्यांच्यामागे अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांचा ताफा आहे. तसेच कार्यकर्त्यांकडून चौका-चौकात त्यांच्यावर फुलांची वृष्टी होत आहे. मनोज जरांगे यांचा ताफा आता पैठणमधून बाहेर पडला आहे. मनोज जरांगे पाटील पुण्यात आल्यानंतर शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्काम करणार आहेत. पुणे येथील वाहतूक व्यवस्था या मोर्चाच्या दृष्टीने चोख ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन कामाला लागले आहे.मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे आता मुंबईकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत शेकडो मराठा आंदोलक आहेत. या आंदोलकांच्या डोक्यावर भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे आहेत.
मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रातून वाढता ओघ
मराठावाड,पश्चिम महाराष्ट्रातील लाखो मराठ्यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ता मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून जोरदार शक्तिप्रदर्शन करत मार्गक्रमण केले, हे मराठा बांधव अंतरवाली सराटी मार्गे मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. यावेळी विविध गावात ग्रामस्थांनी त्यांना वाजत गाजत पाठवणी केली आहे, “एकच मिशन मराठा आरक्षण”, “आता कुठे जायचं मुंबईला जायचं” अशा घोषणाने परिसर दणाणून गेला होता.
हजारो वाहने,लाखो बांधव
या ऐतिहासीक आंदोलनासाठी संपूर्ण मराठवाडा पेटुन उठला आहे.मागील महिनाभरापासून गावोगावी बैठका घेतल्या.कालपासून वाहने अंतरवालीकडे जात होती.आजही दिवसभर नांदेड,परभणी,हिंगोली,बिड,लातूर या भागात हजारो वाहने अंतरवालीत पोहचली.आता ती ताफ्यात आहेत.जालना, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वाहने यात ठिकठिकाणाहून सहभागी होत आहेत.सर्वांनी दोन महिने पुरेल एवढे राशन देखील सोबत घेतले आहे.,त्यासाठी मालवाहु ट्रक व इतर वाहनांचा ताफा आहे.
Shabdraj www.shabdraj.com