सेलू ( प्रतिनिधी )
कै अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था आयोजित स्वरांगण प्रस्तुत ” दिवाळी पहाट ” कार्यक्रमात उपस्थित कलावंतांनी सादर केलेल्या बहारदार गीतांनी उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकले .एका पेक्षा एक गीते सादर करून कलावंतांनी उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या व मने जिंकली.
दिवाळी निमित्त दि२१/१०/२५ मंगळवार रोजी सकाळी सात वाजता शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब मंदिर मध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी उद्योजक रामप्रसाद घोडके ,जेष्ठ नागरिक गोविंदभाऊ जोशी ,ह भ प शिवाजी महाराज खरावणे ,सुरेंद्र मणियार ,के पी वाघमारे , साहित्यिक के डी वाघमारे ,जेष्ठ पत्रकार नारायण पाटील तसेच या कार्यक्रमाचे आयोजक कै अण्णासाहेब सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अशोक काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती .
मान्यवरांच्या हस्ते केशवराज बाबासाहेब महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले . कार्यक्रमाचे हे चौथे वर्ष आहे .
श्री गणेशाच्या तू सुख कर्ता तू दुःख हर्ता या सच्छिदानंद डाखोरे यांच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली .
यावेळी संजय मंडलिक यांनी आकाशी झेप घे रे व हिची चाल तुरु तुरु ही गीते सादर केली तर ऍड अनिरुध्द जोशी यांनी सूर निरागस होवो ,माऊली माऊली रूप तुझे तसेच गोंधळाला उभा गोंधळी हा देवीचा गोंधळ सादर केला .सच्छिदानंद डाखोरे यांनी यावेळी त्यांच्या मधुर स्वरातून कानडा राजा पंढरीचा ,अभिर गुलाल उधळीत रंग ,या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ही गीते सादर केली .या कार्यक्रमासाठी खास पुण्याहून आलेल्या प्रसिद्ध गायिका कीर्ती कस्तुरे यांनी शंभो शंकरा करुणा करा ,आली दिवाळी आली दिवळीव,विकत घेतला शाम ,निसर्ग राजा ऐक सांगते गुपित लपलय र अशी एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली पूजा तोडकर यांनी अरे कृष्णा अरे कान्हा ,अधीर मन झाले ,एरणीच्या देवा तुला, पायोजी मैने राम रतन पायो ,काळ्या मातीत मातीत ही गीते सादर केली .या वयक्तिक गीता सोबतच डाखोरेव व तोडकर यांनी सांग कधी कळणार तुला व गोमू संगतीन तसेच तोडकर व कस्तुरे यांनी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हे युगल गीते सादर केली .
यावेळी सहभागी कलावंत तसेच साथ संगत देणाऱ्या वाद्यवृंद कलाकारांचे कै अण्णाभाऊ काकडे सेवाभावी संस्थे कडून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले .
या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिल्याबद्दल माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा देखील संस्थेच्या वतीने अशोक काकडे व अशोक उफाडे यांनी सत्कार केला .यावेळी बोर्डीकर यांनी अशोक काकडे यांनी आयोजित कार्यक्रमाचे कौतुक करून उपस्थित सर्व मान्यवरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या .
यावेळी निवेदक म्हणून अतुल पाटील यांनी जबाबदारी सांभाळली तर तबला साथ कार्तिक हिंगणे ,ढोलक साथ सिधोधन कदम ,सिंग साथ नईम शेख तर ऑक्टोपॅड साथ रतन चिते यांनी दिली .
माजी नगरसेविका संध्याताई चिटणीस यांचे देखील वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मोहन बोराडे यांनी केले तर आयोजक अशोक काकडे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
Shabdraj www.shabdraj.com