पुर्णा:(सुशिलकुमार दळवी)
पूर्णा तालुक्यात फेब्रुवारी 2026 बारावी (HSC) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग,परीक्षा सहा केंद्रे आणि स्थानिक प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांना शांत आणि सुरक्षित वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी विविध स्तरांवर नियोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील सर्व सहा परीक्षा केंद्रांची तपासणी पूर्ण झाली असून बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही बाबत यांची खात्री करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर पर्यवेक्षक व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉपीमुक्त वातावरणासाठी विशेष भरारी पथके नेमण्यात आली आहेत. सहा परीक्षा केंद्रावर एकूण 1815 विद्यार्थी बसलेले आहेत आहेत. अभिनव विद्याविहार प्रशाला पूर्णाचे परीक्षा केंद्र बदलून संस्कृती महाविद्यालय पूर्णा झालेले आहे याबाबत विभागीय मंडळ यांनी आदेशानुसार कळविण्यात आलेले आहे. सदर बदल विद्यार्थी पालक व प्राचार्य यांनी घ्यावा असे परिपत्रकात सांगितले आहे.
पोलीस प्रशासनाकडून परीक्षा केंद्र परिसरात बंदोबस्त ठेवण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे आणि आवश्यक हॉलतिकीट सोबत ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
……….
विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहून आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचा सल्ला दिला आहे. पूर्णा तालुक्यातील विद्यार्थी यावर्षी चांगले यश परीक्षेची पूर्ण तयारी प्रशासन व शाळांची सज्जता दिसून येत आहे
बालाजी कापशीकर गटशिक्षण अधिकारी
Shabdraj www.shabdraj.com