04/02/26
Breaking News

सरकारने तिजोरी उघडली,भरीव मदतीची घोषणा…वाचा कशी असणार मदत

राज्यात आलेल्या महापुराने शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन उद्धवस्त झाले. राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत असताना दुसरीकडे आज राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचे निर्णय घेतले. शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी फडणवीस सरकारने आपली तिजोरी उघडली असून भरीव मदतीची घोषणा केली आहे.आज मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेला संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, आम्ही पूरग्रस्तांची भेट घेतली. त्यांना झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. सरकारने छोटी मोठी मदत करण्यास सुरुवात केली. आम्ही सातत्याने जास्तीत जास्त मदत कशी करता येईल, याचा विचार करत होतो. आम्ही अनेक बाबींचा विचार केल्यानंतर चार गोष्टींवरील खर्च कपात करू पण शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

 

ज्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती, घरे आणि जनावरांचे नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची जमीनच वाहून गेली असून, त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशा शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन पाण्यात वाहून गेली आहे, त्यांना हेक्टरी 3.47 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. राज्य सरकारने अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या मदतीचं मोठे पॅकेज जाहीर केले आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

> जेवढं नुकसान झालंय त्याची 100 टक्के नुकसान कोणीच देऊ शकत नाहीशेतकरी जास्तीत जास्त पायावर उभा राहिला पाहिजे असा सरकारचा प्रयत्न आहे.
> 29 जिल्हे आणि 253 तालुके यांना मदत करणार आहोत. 2059 मंडळांमध्ये सरसकट नुकसान ग्राह्य धरलं आहे. आता सरसकट नुकसान ग्राह्य धरणार

नव्याने घर बांधणीस मदत करणार असून प्रधानमंत्री आवास योजनांमधून नव्याने घरं बांधून देणार आहोत.
> अंशत: पडझड झालीय त्यांना देखील मदत करणार आहोत.
> मृत्यू पावलेल्या प्रत्येकी दुधाळ जनावरा मागे 37,500 रुपयांची मदत करणार
> कुक्कुटपालनासाठी प्रति कोंबडी 100 रुपयांची मदत

जनावरे आणि घरासाठीही मदतनिधी

 

दुधाळ जनावरांना 37 हजार रुपयांपर्यंत मदत 

गाळ भरलेल्या विहिरींसाठी 30 हजार  

कुकुटपालनाला 100 रुपये प्रति कोंबडी 

नष्ट, पडझड झालेली घरं नव्याने  बांधण्यासाठी मदत

डोंगरी भागातील घरांना 10 हजारांची अधिकची मदत  

झोपड्यांची मदत, गोठा, दुकानदार यांना 50 हजार मदत करणार

विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी करणार 

पीक नुकसानभरपाई 

शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेता आले पाहिजे यासाठी प्रति हेक्टरी 10 हजार रुपये  

हंगामी बागायती शेतीनुकसान भरपाई – हेक्टरी 27 हजार रुपये 

बागायती शेती नुकसान भरपाई – हेक्टरी 32 हजार रुपये  

विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार रुपये  

कोरडवाहू शेतकऱ्यांना 35 हजार 

बागायती शेती ज्यांनी विमा उतरवला असेल त्यांना 50 हजारांहून अधिक मदत मिळेल.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …