04/02/26
Breaking News

सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात

सेलू (प्रतिनिधी )
नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मिलिंद चंद्रकला ज्ञानदेव सावंत यांचा पदग्रहण समारंभ आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी, २ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या थाटात पार पडला. या सोहळ्याला शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची तसेच कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, सेलू बाजार समितीचे सभापती डॉ संजय रोडगे ,माजी सभापती दिनकर वाघ, सेलू तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन मुकेश बोराडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे , सुरेशजी भुमरे ,प्रभाकर वाघीकर ,मुख्याधिकारी तुकाराम कदम ,गणेश काटकर ,अशोक शेलार ,शिवाजी महाराज खवणे ,आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच भाजप गटनेते साईराज बोराडे व भाजपचे नवनिर्वाचित १४ नगरसेवक व विरोधी पक्षाकडून शिवसेनेचे एकमेव नगरसेवक डॉ अनिकेत जोगदंड या कार्यक्रमाला उपस्थित होते.कांग्रेसचे ७ ,शिवसेनेचे ३ व अपक्ष १ यांची मात्र यावेळी अनुपस्थिती होती .
कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम, उप मुख्याधिकारी बी. एस. चव्हाण यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद सावंत ,पॅनाल प्रमुख माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे तसेच निवडणूक प्रभारी दिनकरराव वाघ यांचा यथोचित सन्मान केला .
उपस्थित सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा तसेच सोबतच या निवडणुकीत पराभूत झालेल्या पक्षाच्या उमेदवारांचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी केले .
अगदी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठतेची होत गेली .व त्यात सर्वांच्या सहकार्यामुळे व प्रेमामुळे मी विजयी झालो .हा माझ्या जीवनातील परमोच्च आनंद आहे .बोर्डीकर परिवाराने जो माझ्यावर विश्वास टाकला त्याला कुठेही तडा जाणार नाही .व त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण सेलू शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष मिलींद सावंत यांनी सत्काराला उत्तर देतांना स्पष्ट केले .
भांगडीयानी सेलू शहराची रचनाच सुंदर केली असून सेलूला मराठवाड्यातील सर्वात सुंदर शहर बनवण्याचा आपला मानस आहे .व त्यासाठी मिलिंद सावंत सारखे प्रशासकीय सेवेचा अनुभव असलेले अध्यक्ष आपल्याला मिळाले आहेत . राज्यातून विकासाची गंगा सेलू शहरापर्यंत आणण्याचे काम आतापर्यंत केले आहे.व त्यात भर म्हणजे सेलूच्या मतदारांनी संधी दिल्यामुळे सेलू शहराचा उर्वरित सर्वांगीण विकास कसा करता येईल त्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत.असे प्रतिपादन राज्यमंत्री तथा पालकमंत्री नामदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले .आमच्या पक्षाचे जे उमेदवार पराभूत झाले ते देखील माझ्यासाठी नगरसेवकच मी मानते व प्रभागात तसेच शहरात दिलेले सर्व शब्द पाळले जातील असा विश्वास देखील यावेळी बोर्डीकर यांनी बोलून दाखवला . मतदारांचा विचार व विश्वास पूर्ण करण्यासाठी नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवला
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या “एक पेड माँ के नाम” या उपक्रमाअंतर्गत मंत्रीमहोदया व नगराध्यक्ष यांच्या हस्ते दोन वटवृक्षाचे रोपण करण्यात आले .
दरम्यान प्रशासक असलेले मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी नूतन नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांना नगराध्यक्ष पदाचा कार्यभार सुपूर्द केला .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले तर उपमुख्याधिकारी बी एस चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले
या पदग्रहण सोहळ्याला शहरातील विविध स्तरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …