04/02/26
Breaking News

उद्या केशवराज व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले जाणार-प्रमुख वक्त्या डॉ मंजुषा कुलकर्णी

सेलू / प्रतिनिधी – येथील श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय आयोजित केशवराज व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प उद्या दि 18 डिसेंम्बर रोजी होणार आहे.

 

चला जगूया ऐसें जीवन या विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त जेष्ठ लेखिका तथा कवयित्री आणि मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय मुंबई येथील प्रशासकीय अधिकारी डॉ मंजुषा कुलकर्णी या व्याख्यान देणार आहेत. सायं. 5 वा.शाळेच्या स्व.ऍड वसंतराव खारकर सभागृहात हे व्याख्यान संपन्न होणार आहे.सध्या समाजात धकाधकीचे जीवन,ताण तणाव पाहता आनंदी जीवन कसे जगावे या आगळ्यावेगळ्या विषयाबाबत डॉ मंजुषा कुलकर्णी या व्याख्यान देणार आहेत.तरी सर्वांनी या व्याख्यानास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ऍड.अनिरुद्ध जोशी,सचिव महेश खारकर,व्याख्यानमालेचे संयोजन समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक संजय धारासुरकर,संयोजन समितीचे सचिव मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके यासह सर्व शिक्षकवृंदानी केले आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …