04/02/26
Breaking News

शिक्षकांचा गौरव करून ‘शिवा’ संघटनेने जपली सामाजिक बांधिलकी

सेलू (तालुका प्रतिनिधी) :
शिक्षक दिनानिमित्त सेलू शिवा अखिल भारतीय विरशैव युवक संघटना यांनी शिक्षक दिन निमीत्त शिक्षकांचा सन्मान करून समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जपली. शुक्रवारी सेलू येथील कामगार भवनात आयोजित कार्यक्रमात तब्बल ६५ शिक्षक-शिक्षिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रशेखर नावाडे होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये वसमतचे किर्तनकार व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तथा शिवा राष्ट्रीय भुषण सोनबा शिराळे गुरूजी , पत्रकार रेवणअप्पा साळेगावकर, सेवानिवृत्त शिक्षिका सौ. संगिता शिकारे,संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार नावाडे व तालुका प्रमुख निजलिंगअप्पा तरवडगे यांची उपस्थिती होती.प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि क्रांतीज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन केले.पुजा तोडकर यांनी गायलेल्या कर्णमधुर स्वागतगीताने वातावरण भारावून गेले.
यावेळी शि.भ.प. सोनबा शिराळे म्हणाले, “शिक्षक हा समाज घडविणारा आधारस्तंभ आहे. विद्यार्थ्यांना असे घडवा की ते जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावर कमी पडू नयेत आणि समाजाची उत्तम सेवा करावीत. ‘मरावे परी किर्तीरूपी उरावे’ हा डॉ. राधाकृष्णन यांचा आदर्श आपल्याला घेण्यासारखा आहे.”
पत्रकार रेवणअप्पा साळेगावकर यांनी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले, “समाजात अनेक सधन व्यक्ती आहेत; परंतु सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांची संख्या कमी आहे.त्यात ‘शिवा’ संघटना वेळ, नियोजन व आर्थिक साहाय्य देऊन समाजहितासाठी पुढाकार घेते, ही उल्लेखनीय बाब आहे.”
अध्यक्षीय समारोपात चंद्रशेखर नावाडे यांनी सांगितले की, समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी संवाद आणि परस्परांतील एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यक आहेत.यावेळी शिवशंकर महाजन,सुनिल नवले,सुषमा तरवडगे यांनी सत्काराला उत्तर म्हणून मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक कैलास मलवडे यांनी केले, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी तर आभार प्रदर्शन गुरूबसप्पा पंचगल्ले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रदिप डफुरे,मनोज कांदळे,शंकर राऊत,प्रकाश साखरे,बबनअप्पा झमकडे,रामदास पाटील,रामा कटारे,देवराव चौरे,मनोहर चलोदे,सुजित मिटकरी,नवनाथ सोनटक्के,सुनिल नवघरे, गणेश केशरखाने,प्रथमेश भगत,बालासाहेब क्षिरसागर,सुनिता डफुरे, शारदा नावाडे यांनी परिश्रम घेतले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …