04/02/26
Breaking News

सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचे विचार व कार्य मानवतावादी होते : प्राचार्य डॉ. बबन पवार

परभणी,दि 26ः
येथील शारदा महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने भगवान चक्रधर स्वामी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बबन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. शामसुंदर वाघमारे उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.बबन पवार म्हणाले की महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक स्वामी चक्रधर यांनी जगा आणि जगू द्या असा अहिंसावादी विचार जगाला दिला. त्यांचे एकूणच कार्य हे मानवतावादी होते असे मत प्रतिपादन केले.
यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात उर्दू विभागातील बी. ए.प्रथम वर्षाच्या सोमीया फातेमा, अन्सारी सानिया, झेनत बेगम या विद्यार्थिनींनी भित्तीपत्रक केले. या भित्तीपत्रकाला उर्दू विभाग प्रमुख डॉ. काझी कलीमोद्द्दीन व. डॉ. नुरुल अमीन यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शाम पाठक तर आभार प्रदर्शन कार्यालय प्रमुख सुरेश जयपूरकर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ.अविनाश पांचाळ, डॉ.काझी कलिमोद्द्दीन,राजाराम मुत्रटकर, तनुजा रासवे, संतोष एडके व काझी नसीरुद्दीन यांनी प्रयत्न केले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …