परभणी ता. 4
महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. जाहीर प्रभाग रचनेत फारसे बदल नाहीत. काही प्रभागाच्या व्याप्ती आणि सीमा रेषेत अंशतः बदल आहेत. उर्वरित बहुतांशी प्रभाग पूर्वीप्रमाणेच आहे.
पालिका मुख्यालय, नटराज रंग मंदिर व कल्याण मंडपम येथील समिती कार्यालयात प्रभाग रचना. आज नकाशासह झळकावण्यात आली.
ती रचना कार्यालयीन वेळेत पाहण्यास उपलब्ध राहणार आहे. याशिवाय महानगरपालिकेच्या वेबसाईट https://pcmcparbhani.org/ वर देखील प्रारूप प्रभागाचे नकाशे पहावयास उपलब्ध असणार आहेत.
प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभाग रचने वरती हरकती व सूचना घेण्याकरिता 15 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अवधी देण्यात आला आहे. सदर हरकती या प्रभाग समिती कार्यालय, तसेच मनपा मुख्यालयातील निवडणुक विभागात दाखल करता येतील, अशी माहिती आयुक्त नितीन नार्वेकर यांनी दिली आहे.
Shabdraj www.shabdraj.com