सेलू / नारायण पाटील – आज केलेला सत्कार हा माझा नसून केशवराज बाबासाहेब महाराजांच्या सेवेचा व कृपेचा प्रसाद आहे .असे मत ह भ प वसंत महाराज मंडलिक यांनी सत्काराला उत्तर देतांना व्यक्त केले .
केशवराज बाबासाहेब महाराजांचे निस्सीम भक्त तथा पुजारी ह भ प वसंत महाराज यांना नुकताच ” “कीर्तन श्री ” हा नेरलकर पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल गजानन कृपा कोचिंग क्लास चे संचालक संतोष कुलकर्णी यांनी त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते .
याच कार्यक्रमात भागवताचार्य प्रा.संजय पिंपळगावकर व चंद्रकांत कुलकर्णी ( धामणगावकर ) यांच्या वाढदिवसानिमित अभिष्टचिंतन सोहळा देखील संपन्न झाला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईबाबा बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर हे होते .तर केशवराज शिक्षण संस्थेचे सचिव महेशराव खारकर ,शारदा विद्यालयाचे संचालक प्रल्हादराव कान्हेकर ,नूतन संस्थेचे सदस्य मकरंद दिग्रस्कर ,तलाठी मुकुंद आष्टीकर ,सत्कार मूर्ती ,ह भप वसंत महाराज मंडलिक ,सौ वर्षाताई मंडलिक ,भागवताचार्य प्रा संजय पिंपळगावकर ,चंद्रकांत कुलकर्णी आदी मान्यवरांची व्यासपीठावर उवस्थिती होती.
यावेळी प्रास्ताविकात या कार्यक्रमाचा उद्देश व आवश्यकता आयोजक संतोष कुलकर्णी यांनी स्पष्ट केली .
मान्यवरांच्या हस्ते यावेळी ह भ प वसंत महाराज मंडलिक यांचा यावेळी सपत्नीक सत्कार करण्यात आला .तर प्रा संजय पिंपळगावकर व चंद्रकांत कुलकर्णी यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले .
ह भ प वसंत महाराज मंडलिक व प्रा संजय पिंपळगावकर यांनी सत्काराला यथोचित उत्तर दिले .
शाम आढे यांनी देखील यावेळी मनोगतात कार्यक्रमाचे कौतुक केले .
समाजातील व्यक्तीच्या कर्तबगारी बद्दल दखल अशी कौतुकाची थाप दिली तर निश्चित त्याला समाधान मिळते .व समाजाकडून आपल्या कार्याची कुठेतरी दखल घेतल्याची जाणीव होते .त्यामुळे गजानन कृपा कोचिंग क्लासेसच्या वतीने घेण्यात आलेला सत्कार व अभिष्टचिंतन सोहळा निश्चितच प्रेरणादायी असून भविष्यात देखील असे कार्यक्रम होणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोपात चंद्रशेखर मुळावेकर यांनी केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी कुलकर्णी यांनी केले .तर रवींद्र मुळावेकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले .यावेळी सर्व स्तरातील समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Shabdraj www.shabdraj.com