04/02/26
Breaking News

एक खराब रस्ता दुरुस्त करण्यासाठी दुसरा रस्त्यावर केला चिखल

सेलु,दि 31 (प्रतिनिधी)ः
सेलू तालुक्यात खराब रस्त्यांचे दुरुस्तीकरण,नवीन रस्ते करण्याचे काम जोमात सुरू आहे.पण या कामात एक अजब प्रकार घडला आहे.एक रस्ता पूर्ण करण्यासाठी दुसरा रस्ता खराब करून ठेवल्याने शेतकऱ्यांना मात्र याचा त्रास सहन करावा लागत आहे.प्रशासन सुद्धा या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने दाद मागावी कुणाकडे हे मात्र शेतकऱ्यांना समजत नसल्याचा प्रकार सुरू आहे.
सेलू डिग्रस रस्त्या हा पूर्ण पणे खराब झाला होता.या रस्त्यासाठी निधी मंजूर केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर ओरड झाल्यानंतर या रस्त्याचे काम सुरू झाले.काम चांगले आणि गतीने सुरू झाले परंतु या रस्त्याला लागूनच सेलू धनेगाव हा शिव रस्ता आहे.संबंधित कंत्राटदाराने या रस्त्यासाठी लागणारा मुरूम या शिव रस्त्याने आणल्याने मोठमोठे खड्डे या रस्त्यावर पडले आहेत.यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाहेर काढणेही अवघड झाले आहे.सेलू धनेगाव या रस्त्याचे यापूर्वी मातीकाम झाले होते तेव्हा हा रस्ता व्यवस्थित होता.परंतु सेलू डिग्रस रस्ता करणाऱ्या यंत्रणेने या रस्त्यावरून मोठं मोठे हायवा भरून मुरूम आणल्याने या शिव रस्त्यावर खड्डे पडले आहेत.खर तर या शिव रस्त्याने मुरूम आणणे योग्य होते का? केवळ कंत्राटदाराला अंतर जवळ पडते म्हणून या रस्त्याने मुरूम आणला का? विशेष म्हणजे उन्हाळ्यात झालेल्या अतोनात पावसात देखील या रस्त्याने मुरूम आणला.यावेळी एखादा हायवा चिखलात फसला तर जेसीबीच्या साह्याने हायवा बाहेर काढून मुरूम आणला गेल्याने या शिव रस्त्याची पूर्ण चाळणी झाली आहे.याकडे प्रशासन सुद्धा डोळेझाक करीत आहे.
यानंतर शेतकऱ्यांनी ओरड केल्यावर या रस्त्यावर पुन्हा मुरूम टाकून रस्ता सुरळीत करणे अपेक्षित होते परंतु संबंधित कंत्राटदाराने थोडा सुद्धा मुरूम न टाकल्याने या रस्त्यावरून बैलगाडी किंवा इतर वाहने जाणेही मुश्किल झाले आहे.एक रस्ता करण्याचा नादात दुसरा रस्ता खराब करून ठेवण्याचा उत्तम नमुना म्हणजे सेलू धनेगाव शिवरस्ता असल्याची चर्चा शेतकरी करीत आहेत.या रस्त्यावरून मातीकाम झाल्यानंतर मजबुतीकरण होईल आणि आपल्याला शेतात जायला चांगला रस्ता होईल या अपेक्षेने शेतकरी सुखावले होते परंतु मजबुतीकरण तर झालेच नाही उलट मातीकामातून थोडा फार चांगला झालेला रस्ताही मोठं मोठ्या हायवातून मुरूम आणल्याने पूर्णपणे खराब झाल्याने शेतकरी संताप व्यक्त केला जात आहे.

सेलू – धनेगाव शिवरस्ता पुन्हा अतिक्रमनाच्या विळख्यात सापडला असून रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी अतिक्रमण वाढत असल्याने ३३ फुटाची असणारी शिव केवळ १५ फुटावरच येऊन ठेपली आहे .त्यामुळे या शिवरस्त्याने वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडचणीचे होत आहे .तरी महसूल प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर उपाय योजना करून हा अतिक्रमनाच्या विळख्यात सापडलेला हा शिवरस्ता मोकळा करून घ्यावा .अशी मागणी जोर धरीत आहे

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …