परभणी,दि.18(प्रतिनिधी) : पूर्णा ते झिरोफाटा या महत्वपूर्ण रस्त्यावरील वाहतूक गेल्या चार दिवसांपासून पूर्णतः ठप्प आहे. या रस्त्यावरील माटेगांव जवळील नदीवरील पुलाचे काम अद्यापही रखडल्यामुळे व जून्या पुलावरुन मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्यामुळे पंचक्रोषितील ग्रामस्थांचे जनजीवनच ठप्प झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी माटेगांव जवळील या पुलाचे काम वेळेत पूर्ण होईल, असे जाहीर केले होते. दुर्देवाने ते काम वेळेत तर पूर्ण झालेच नाही. उलटपक्षी ते काम संथ गतीने सुरु होते. त्यामुळे ते काम महिनोनमहिने रखडले. सद्यस्थितीत या पुलाचा स्लॅब पूर्ण झाला आहे. परंतु, दोन्ही बाजूच्या भरावाचे काम पूर्ण नाही. त्यामुळेच नवीन पूल वाहतूकीस खुला नाही, माटेगावसह पंचक्रोषितील ग्रामस्थांनी रखडलेल्या या पुलाच्या कामाकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या पंचक्रोषितील गावांमध्ये या पुलामुळे होणारा त्रास निदर्शनास आणून दिला परंतु, उपयोग झाला नाही.
Shabdraj www.shabdraj.com