हैदराबाद विभागातील भिकनूर – तळमडला – अक्कनपेट सेक्शन मध्ये काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी खालीलप्रमाणे बदल लक्षात घ्यावेत:
1️⃣ (दिनांक 28 ऑगस्ट 2025) रोजी सुटणारी गाडी क्र. 17064 काचेगुडा – मनमाड अजंठा एक्स्प्रेस ही गाडी सिकंदराबाद – विकाराबाद – परळी – परभणी मार्गे वळविण्यात आली आहे. या गाडीला माल्काज्गिरी, बोलाराम, मेद्चल, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, उमरी, मुदखेड़, नांदेड व परभणी या स्थानकांवर थांबे राहणार नाहीत.
2️⃣ (दिनांक 28 ऑगस्ट 2025) रोजी सुटणारी गाडी क्र. 12788 नगरसोल-नरसापूर ही गाडी परभणी – परळी – विकाराबाद – सिकंदराबाद – चार्लापार्ल्ली मार्गे चालविण्यात येईल. या गाडीचे पूर्णा, नांदेड, मुदखेड़, बासर, निजामाबाद व कामारेड्डी येथील थांबे रद्द केले आहेत.
3️⃣ (दिनांक 27 ऑगस्ट 2025) रोजी सुटणारी गाडी क्र. 12719 जयपूर – हैदराबाद एक्स्प्रेस ही गाडी पूर्णा, परभणी – परळी – विकाराबाद – हैदराबाद या मार्गे वळविण्यात आली आहे. या गाडीचे नांदेड, मुदखेड़, कामारेड्डी व सिकंदराबाद येथील थांबे राहणार नाहीत.
प्रवाशांनी ही बदललेली माहिती लक्षात घेऊन प्रवास करावा. संबंधित स्थानकांवर घोषणा, नोटीस बोर्ड, प्रसारमाध्यमे तसेच एसएमएसद्वारेही माहिती दिली जात आहे. प्रवाशांना होणारा गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.
जनसंपर्क कार्यालय, नांदेड
Shabdraj www.shabdraj.com