16/10/26
Breaking News

अ.भा.ग्राहक पंचायत गंगाखेड शाखेच्या वतीने स्वामी विवेकानंदांना अभिवादन

गंगाखेड प्रतिनिधी
युवकांचे प्रेरणास्थान,थोर विचारवंत आणि महान राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत,गंगाखेड शाखेच्या वतीने (दिनांक ४ जुलै शनिवार) रोजी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.शहराध्यक्ष मकरंद चिनके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमात सर्वप्रथम स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस उपस्थित सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या राष्ट्रभक्ती,आत्मविश्वास,चारित्र्यनिर्मिती आणि युवकांना दिलेल्या प्रेरणादायी विचारांचा अंगीकार करून युवकांनी कार्य करावे असे मत ज्येष्ठ सदस्य रामप्रसाद ओझा यांनी व्यक्त केले.याप्रसंगी महिला तालुकाध्यक्ष डॉ.प्रतिभाताई वाघमारे,आशाताई रेघाटे,तालुका उपाध्यक्ष महेमूद शेख,रामप्रसाद ओझा,पर्यावरण आयाम प्रमुख ॲड.राजू देशमुख,शिवाजी चव्हाण,अतुल कलकोटे,उमाकांत साकोळकर,माणिकराव मुंडे,बालाजी डमरे,कल्याण लांडगे यांच्यासह ग्राहक पंचायतचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …