04/02/26
Breaking News

श्री शिवाजी विधी महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

परभणी,दि 02 (प्रतिनिधी)ः
श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी,राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी येथे प्राचार्य डॉ. एम. एल. धर्मापुरीकर यांच्या
उपस्थितीत महाविद्यालत दोन महापुरुष ज्यांनी देशाला घडविण्यात मोलाचे योगदान दिले एक म्हणजे
ज्यांना “राष्ट्रपिता” म्हणून ओळखले जाते. त्यांनी सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या तत्त्वांवर आधारलेले स्वातंत्र्य आंदोलन उभारले. ज्यांनी दक्षिण आफ्रिकेत वकिली करताना अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि दुसरे म्हणजे लाल बहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान. “जय जवान, जय किसान” हा त्यांचा घोष आजही प्रेरणादायी मानला जातो.त्यांनी नेहमीच राष्ट्रहिताला व्यक्तिगत जीवनापेक्षा प्राधान्य दिले.अश्या प्रेरणादायी महापुरुष जयंती दिनी
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. आर. बी . देशमुख व प्रा. डॉ. ए. आर. देशमुख, तसेच सर्व प्राध्यापक वर्ग व प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दोन्ही महापुरुषांच्या जयंती निमित्त मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. आ. श्री. प्रकाश दादा सोळंके, सचिव मा. आ. श्री. सतीश भाऊ चव्हाण तसेच महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य मा.श्री. चंद्रशेखर नखाते, मा. श्री. गोविंद कदम, मा. श्री. मगदूम मोहीउद्दीन, मा. श्री. संतोष बोबडे, मा.ॲड. दीपक देशमुख, मा. ॲड. अशोक शिंदे, मा. श्री. संतोष इंगळे आदींनी शुभेच्छा दिल्या…

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …