सेलू / प्रतिनिधी – शहरात दोन आकस्मित मृत्यूच्या घटना घडल्या असून दिलेल्या खबरीवरून सेलू पोलिसात आकस्मित मृत्यू रजिस्टर ला नोंद घेण्यात आली असून पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.
यामध्ये जालना येथील पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेला राजगड कॉलनी सेलू येथील गोपाल तुकाराम कल्याणकर (२०) हा श्वसनाचा त्रास होत असल्याने दि ३०/१०/२५ रोजी येथील परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू असताना मरण पावला आहे.
तर अशोक भगवान बुधवंत ( ४३ ) हा दि १/११/२५ रोजी सेलू येथील एका कारखान्यात सफाई कामासाठी गेला असता अचानक बेशुद्ध पडल्याने त्यास उपचारासाठी येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हौस्पिटल मध्ये नेले असता त्याचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे सांगीतल्यानंतर संदीप सोपानराव पतंगे व अशोक परसराम बुधवंत यांनी दिलेल्या वेगवेगळ्या खबरीवरून आकस्मित मृत्यू रजिस्टर क्रमांक 57/58 -2025 ला नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Shabdraj www.shabdraj.com