परभणी : – दि. १३ ऑक्टोबर
परभणी जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने अतिवृष्टी व पुरामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी आपल्या दोन दिवसांच्या वेतनाचे योगदान मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहे.
परभणी जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संवर्गात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी यांचा समावेश आहे.
परभणी जिल्ह्यात महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटने मधील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, प्रकल्प संचालक स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) डॉ.संदीप घोन्सीकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अंकुश चव्हाण, सर्व गट विकास अधिकारी सहायक गट विकास अधिकारी आदींनी ठराव घेऊन दोन दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
…..
राज्यभरात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले वेतनाचे योगदान देण्याचे ठरले आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र विकास सेवा अधिकारी संघटनेने हा निर्णय घेतला आहे. परभणी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी देखील या संकल्पनेला पाठिंबा दर्शविला आहे.
रश्मी खांडेकर
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
……….
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांच्या या संकटात जिल्हा परिषद महाराष्ट्र विकास सेवा अधिकारी संघटना खंबीरपणे उभी आहे. सर्व शेतकरी बांधवांना हातभार लागावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ.संदीप घोन्सीकर
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य)
Shabdraj www.shabdraj.com