04/02/26
Breaking News

शेतकऱ्यांसाठी 35,440 कोटींच्या दोन योजना,दिवाळीचं गिफ्ट

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) शेतकऱ्यांसाठी 35,440 कोटींच्या दोन योजना सुरू केल्या आहेत. ‘डाळ स्वावलंबन अभियान’ आणि ‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना’ अशी या योजनांची नावे आहेत. समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात पंतप्रधानांवी कृषी, पशुपालन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील 5450 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. तसेच 815 कोटी रूपयांच्या इतर प्रकल्पांची पायाभरणी केली.

‘डाळ स्वावलंबन अभियान’ या योजनेवर 11,440 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून 2030-31 सालापर्यंत डाळींचे उत्पादन सध्याच्या 25.238 दशलक्ष टनांवरून 35 दशलक्ष टनांपर्यंत वाढवणे आणि देशाचे आयात अवलंबित्व कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना

पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेवर सरकार 24000 कोटी रुपये खर्च करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात मागास असणाऱ्या 100 जिल्ह्यांचा कायपालट करण्याची सरकारची योजना आहे. ही योजना पीक उत्पादन, वेगवेगळी पीके घेण्यास शेतकऱ्यांना मदत करणे, सिंचन आणि पाणी साठवणूक क्षमता सुधारणे आणि शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध करुन देण्यास फायदेशीर ठरणार आहे. दोन्ही योजनांना आधीच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. या योजना येत्या रब्बी हंगामापासून 2030-31 पर्यंत चालू रागणार आहेत.

आज पंतप्रधानांनी काही प्रकल्पांचे उद्घाटन केले. यात बेंगळुरू आणि जम्मू आणि काश्मीरमधील कृत्रिम रेतन प्रशिक्षण केंद्रे, अमरेली आणि बनासमधील उत्कृष्टता केंद्रे, राष्ट्रीय गोकुळ अभियानांतर्गत आसाममधील आयव्हीएफ प्रयोगशाळा, मेहसाणा, इंदूर आणि भिलवाडा येथील दूध पावडर प्लांट आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत तेजपूर येथे मासेमारीचा प्लांट या प्रकल्पांचा समावेश आहे.

Check Also

पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात अजित पवारांकडून मोठा खुलासा…

मुंबई : पुण्यातील कोंढवा येथील जमीन व्यवहारातील अनियमिततेप्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर आता …