गंगाखेड,दि 19 ः
महर्षी याज्ञवल्क्य संस्कृत विद्या प्रतिष्ठान, यज्ञभूमी गंगाखेड येथील विद्यार्थी चि. सोमनाथ जोशी व चि. प्रसन्न कुलकर्णी या दोघांनी यंदा वैदिक शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यशाची नोंद केली आहे. मागील वर्षी घेण्यात आलेल्या शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखा – अध्याय १ ते ४० या राज्यस्तरीय वेद परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम श्रेणी प्राप्त करून त्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या उज्ज्वल कामगिरीबद्दल पुण्यातील श्री वेदशास्त्रोत्तेजक सभा, महाराष्ट्र मंडळ यांच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात मान्यवर विद्वतांच्या हस्ते दोन्ही विद्यार्थीांना “आदर्श विद्यार्थी पुरस्कार” प्रदान करण्यात आला. वैदिक परंपरा, श्रुति-स्मृती अध्ययनात सातत्याने प्राविण्य मिळवत असलेल्या या विद्यार्थ्यांचा सन्मान करताना उपस्थित विद्वतगणांनी त्यांच्या कष्टाचे, निष्ठेचे आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचे विशेष कौतुक केले.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे वेदाध्यापक श्री शुभम पुराणिक गुरुजी, श्री शैलेश दाणी गुरुजी तसेच संस्थेतील सर्व कार्यकर्त्यांचेही मान्यवरांनी अभिनंदन केले. वैदिक संस्कृती, धर्मपरंपरा आणि यज्ञ–याग परंपरेचे संवर्धन करणाऱ्या या संस्थेच्या कार्याला “वैदिक मूल्यांचे उज्ज्वल भविष्य” अशी गौरवोद्गारांनी दाद देण्यात आली.
Shabdraj www.shabdraj.com