16/10/26
Breaking News

जहांगीर डिग्रस शाळेतील दोन शिक्षकांची राज्यस्तरिय स्पर्धेसाठी निवड

सेलू( प्रतिनिधी)
तालुक्यातील जहांगीर दिग्रस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील श्री.शेख मौजम अब्दुल यांची मराठी ऑलिम्पियाड स्पर्धेत विभाग स्तरावर निवड होऊन ते राज्यस्तर मराठी ऑलिम्पियाड या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत तर श्रीमती दुर्गा सदाशिव घोडके यांची सुद्धा नाट्य/नाटक/भूमिका अभिनय या स्पर्धेतछत्रपती संभाजी नगर विभाग स्तरावर निवड होऊन त्या राज्य स्तरासाठी पात्र ठरले आहेत. जिल्ह्यात एकाच शाळेचे दोन शिक्षक राज्य स्तरावर स्पर्धेसाठी पात्र ठरले त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.त्या निमित्ताने गावकऱ्यांनी आज त्यांचा सत्कार केला..व राज्य स्तरासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुंडलिकराव पौळ, उपाध्यक्ष बालाजी राव पौळ, उपसरपंच बाबासाहेब पौळ, गुलाबराव पौळ,अंशीराम पौळ, शेषेराव गुरव,रमेश धोपटे, श्रीमती रेखा बोराडे उपस्थित होते.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …