केरळचे माजी मंत्री आणि सत्ताधारी डावी आघाडी एलडीएफचे आमदार एंटनी राजू यांना २५ वर्ष जुन्या प्रकरणात कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. केरळच्या नेडुमंगाजडच्या दंडधिकारी कोर्टाने ‘अंडरवेअर ड्रग्स’ प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राजू यांनी १९९० साली ज्युनिअर वकील म्हणून केस लढवली होती. केस लढताना त्यांनी पुराव्यांशी छेडछाड केली होती.
‘अंडरवेअर ड्रग्स’ प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा मिळाल्याने एंटनी राजू यांची आमदारकी जाणार आहे. त्यांना निवडणूक देखील लढवता येणार नाही. ९०च्या दशकातील या प्रकरणामुळे एंटनी राजू यांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं आहे. त्यांनी वरील न्यायायलयात दाद मागण्यासाठी एक महिन्याचा अवधी देण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ऑस्ट्रेलियाचा नागरिक अँड्र्यू साल्वाटोर सर्वेली याला तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली होती. साल्वटोर याने निळ्या रंगाची अंडरवेअर घातली होती. याच अंडरवेअरमध्ये ६१.५ ग्रॅम ड्रग्स लपवले होते. या प्रकरणात दोषीला तीन ते पाच वर्षांची शिक्षा होते. परंतु या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं. साल्वाटोर यांचं प्रकरण लढण्याची जबाबदारी ज्युनिअर वकील एंटनी राजू यांना मिळाली होती.
कायदे प्रक्रियेनुसार आरोपीच्या अंडरवेअरमधीर ड्रग्स जप्त केले होते. त्यामुळे आरोपीविरोधात भक्कम पुरावे होते. याच पुराव्याच्या आधारे आरोपीला १० वर्षांची शिक्षा सुनावली आणि १ लाखांचा गंड ठोठावला.
Shabdraj www.shabdraj.com