सेलू/ प्रतिनिधी
शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताच्या सार्ध शताब्दी महोत्सवानिमित्त (दि.०७ नोव्हेंबर)शुक्रवार रोजी विद्यार्थ्यांचा वंदे मातरम गीताचे सामुहिक गायन कार्यक्रम घेण्यात आला.
व्यासपीठावर स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी,स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर यांची उपस्थिती होती. प्रमुख वक्ते म्हणुन मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे होते ते पुढे म्हणाले की ,वंदे मातरम गीत स्वातंत्र्य संग्रामातील एक जाज्वल्य प्रतीक होते.१५० वर्षांपूर्वी लिहिलेले गीत आजही आपला आत्मा हलवून जातं कारण त्यात भक्ती,वेदना आणि प्रेम आहे म्हणूनच हे केवळ गीत नसून भारताचं धडधडत ह्रदय आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद मंडलिक ,पद्य विजय चौधरी तर आभार अनिल कौसडीकर यांनी मानले.रागिणी जकाते व संच यांनी संपूर्ण वंदे मातरम गायले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक बंधू भगिनी तसेच कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले.
Shabdraj www.shabdraj.com