04/02/26
Breaking News

विजयसिंह पंडित यांनी काढली थेट लक्ष्मण हाकेंची लायकी

ओबीसी नेते लक्ष्मण हाके नेहमी चर्चेत असतात. अशातच आता बीडच्या गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात संघर्ष पेटला आहे. बीडमध्ये दाखल झाल्यानंतर विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला केला. जोरदार घोषणाबाजी करत हाकेंच्या ताफ्यावर समर्थक धावून गेले. पण वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना पांगवलं. या घडलेल्या प्रकारनंतर विजयसिंह पंडित यांनी थेट लक्ष्मण हाकेंची लायकी काढली. तसेच कोणचाही बेलगामपणा आणि उन्मादपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देखील दिला.

विजयसिंह पंडित म्हणाले, जो काही प्रकार घडला तो क्रियेला प्रतिक्रिया आहे. एवढं उन्माद आणि बेलगामपणे वागायचं कोण खपवून घेणार आहे. तीन चार दिवसापासून बीडमध्ये येऊन बैठका घेऊन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू होते. वादग्रस्त वक्तव्य करत वीष कालवायचे, खालच्या पातळीवर जाऊन बोलायचे… तुला दंडुक्याने मारायचे…मी क्षत्रिय आहे , मला दडुंक्याने मारणारा अजून पैदा झाला नाही. माझ्या सहकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बॅनर लावले. ते बॅनर पाहून याला काय झालं माहित नाही. काही बोलायला लागला..
मी एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे म्हणून मी गप्प आहे. माझ्या सहकाऱ्यांच्या भावना तीव्र आहे, लक्ष्मण हाकेच्या वक्तव्यानंतर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्याला प्रतिबंध करण्याची मागणी केली आहे. अजित पवारांविषयी खालच्या भाषेत वक्तव्य करतो,याची लायकी काय, पात्रता काय? मी लोकांना समजून सांगितलं, लोकं आमचे एका जागेवर बसवून ठेवलं… संपूर्ण मतदारसंघात तीव्र भावना आहे. मी फोनवर सगळ्यांना समजून सांगितलं.. लोकांना भडकावणे, उचकावणे हे याचं कामचं आहे . लाईम लाईटमध्ये येण्याचे प्रयत्न सुरू आहे. याला कुठेतरी लगाम लावला पाहिजे, असेही विजयसिंह पंडित म्हणाले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …