04/02/26
Breaking News

डॉ. होमी भाभा परीक्षा २०२५ मध्ये व्हिजन इंग्लिश स्कूलची सर्वाधिक निकालाची परंपरा कायम

सेलू / प्रतिनिधी – येथील गजानन सेवा प्रतिष्ठान संचलित व्हिजन इंग्लिश स्कूलने डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा २०२५ मध्ये घवघवीत यश संपादन करून सर्वाधिक निकालाची नोंद केली आहे. शाळेतील एकूण ७२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली त्यापैकी ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे १९ विद्यार्थी दूस-या फेरी साठी पात्र ठरले आहेत.

 

सदरिल यश शाळेत राबविण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक अध्ययन पद्धतीचे तसेच होमी भाभा परीक्षेच्या तयारीसाठी शाळेत विशेष अभ्यासक्रम, संकल्पनाधारित अध्यापन, प्रयोगांवर आधारित शिकवण, नियमित सराव चाचण्या व शंका निरसन सत्रे घेतली जातात.
दूस-या फेरीसाठी पात्र विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत.

इयत्ता ९ वी
महेक निलेश गोरी ६२,अनिकेत ओमप्रकाश कव्हळे ६०,
ओजस संतोष कूलकर्णी ५६,अदिती अनंत थोंबाळ ५५,श्रेयश अंकूशराव कव्हळे ५२,अर्णवी संदिप काळे ५०,
शिवराज लिंबाजी आंधळे ४९,श्रेयश राजेसाहेब खाडप ४९,तर
इयत्ता ६ वी अनूज राधाकिशन वाघ ६३,शफिद अली वाहेद अली शेख ६०,विर दिनेश पटेल ५७,अर्पण अशिष डख ५७,त्रिशा कूलजित फोसे ५६,अनूष्का बालाजी सोनवणे ५६,आद्या सचिन काळे ५५,सारांश सूूमित डालिया ४९,विराज दिनेश पटेल ४९,चिन्मय मैराळ ४९,अगम अशिष लोढा ४८,यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष कूलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी शाळेची शैक्षणिक दृष्टी स्पष्ट करताना सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये केवळ परीक्षेपुरते ज्ञान न राहता वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचार, प्रयोगशीलता आणि आत्मविश्वास निर्माण करणे हेच शाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष कुलकर्णी,साजिद शेख,मुख्याध्यापक गोविंद जाधव व अस्मिता संगई यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

विद्यार्थ्याच्या यशासाठी साजिद शेख ,गोपाल उदावंत,संगिता सोनवणे यांनी विशेष वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.या उल्लेखनीय यशामुळे व्हिजन इंग्लिश स्कूलने गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रयोगशाळा आधारित अध्यापन व तज्ज्ञ मार्गदर्शनाच्या जोरावर सर्वाधिक निकाल देण्यात आपले अग्रस्थान अधोरेखित केले आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …