04/02/26
Breaking News

आचारसंहिता म्हणजे काय? नियम आणि अटी काय असतात?

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून, 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. संपूर्ण निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाची जबाबदारी वाढते आणि त्याला अनेक अधिकारही मिळतात. ज्याद्वारे ते राजकीय पक्षांपासून प्रशासनापर्यंत प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असतात. मग आता आचारसंहिता दरम्यान कोणकोणत्या कामांवर बंदी घालण्यात येते. आचारसंहिता म्हणजे काय? नियम आणि अटी काय असतात? हे सविस्तरपणे जाणून घेऊ.
आचारसंहिता म्हणजे काय?

कोणतीही निवडणूक निष्पक्ष आणि मुक्तपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग काही नियम आणि अटी घालून देत असते. याच नियमांना आचारसंहिता म्हणतात. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होत असते. जी निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहते. राजकीय पक्ष, सरकार आणि निवडणुकीत सहभागी होणाऱ्या प्रशासनासह सर्व अधिकृत विभागांशी संबंधित सर्व लोकांवर या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी असते.

निवडणूक आयोगाची जबाबदारी काय असते? 

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे, मात्र त्याआधीच आयोगाचे अनेक नियम आणि जबाबदाऱ्या असतात. ज्यांवर निवडणूक आयोग लक्ष ठेवतो. उदाहरणार्थ, कोणत्याही राज्यात निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी, एखादा अधिकारी त्याच जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून कार्यरत असेल किंवा त्याच्या पदस्थापनेला तीन वर्षे पूर्ण झाली असतील, तर त्याची त्या जिल्ह्यातून बदली करावी लागते. तथापि, हे नियम डीईओ, आरओ, एआरओ, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि त्यावरील पदांच्या अधिकाऱ्यांना लागू असतात. तसेच, निवडणूक आचारसंहितेशी थेट संबंध असलेल्या अधिकाऱ्यांची त्यांच्या गृहजिल्ह्यांमध्ये नियुक्ती केली जात नाही.

यम आणि अटी काय?

1) आचारसंहिता लागू झाल्यानंतर केंद्र किंवा राज्य सरकारकडून कोणत्याही नवीन योजना किंवा नवीन घोषणा करता येणार नाहीत.
2) निवडणुकीच्या तयारीसाठी सरकारी संसाधनांचा वापर करता यणार नाही. जसे सरकारी वाहन, बंगला, विमान इ.
3) आचारसंहिता लागू होताच, भिंतींवर लिहिलेल्या सर्व पक्षीय घोषणा आणि प्रचार साहित्य काढून टाकण्यात येते. होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर्सही काढले जातात.

4) राजकीय पक्षांना रॅली, मिरवणुका किंवा सभांसाठी परवानगी घ्यावी लागते.
5) निवडणुक प्रचारा दरम्यान धार्मिक अजेंडा वापरता येत नाही.
नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

आचारसंहिता लागू होताच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सरकारी कर्मचारी निवडणूक आयोगाचे कर्मचारी म्हणून काम करत असतात. आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच ते काम करत असतात. याशिवाय, निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सूचनांचे पालन होत असल्याची खात्रीही ते करतात. जर कोणी या नियमांचे पालन केले नाही, किंवा त्यांचे उल्लंघन करताना आढळल्यास, निवडणूक आयोग त्याच्यावर कारवाई करू शकतो. तसेच उमेदवाराला निवडणूक लढविण्यापासून रोखू शकतो किंवा त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदविला जाऊ शकतो. संबंधित उमेदवार दोषी आढळल्यास त्याला तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते.

Check Also

अन्यथा लाडकी बहीण योजनाच बंद करा! राज्यभरात सरकारविरोधात संताप

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील हजारो महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाहीत. केवायसीमध्ये संभ्रमात टाकणारे प्रश्न विचारण्यात …