भारतीय लोकशाहीचा पाया हा “जनतेचे शासन, जनतेद्वारे आणि जनतेसाठी” या तत्त्वावर उभा आहे. या तत्त्वाचा मूळ गाभा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. कारण केंद्र आणि राज्य सरकार जितके व्यापक क्षेत्र पाहतात, तितक्याच सूक्ष्म पातळीवर सामान्य लोकांच्या समस्या सोडविण्याचे आणि विकास घडविण्याचे काम या संस्थांकडून केले जाते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचे खरे आधारस्तंभ मानल्या जातात.
स्थानिक स्वराज्य संस्थेची संकल्पना (Concept of Local Self-Government)
“स्थानिक स्वराज्य संस्था” म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील नागरिकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून त्या भागाचा कारभार स्वतः चालविणारी संस्था.
सोप्या भाषेत सांगायचे तर — एखाद्या गाव, शहर किंवा जिल्ह्याचा विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, कर वसुली अशा दैनंदिन कामकाजाचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी निवडलेले प्रतिनिधी ज्या संस्थांद्वारे काम करतात, त्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. लोकशाही पातळीवर नागरिकांचा सहभाग वाढवणे. तसेच स्थानिक विकास व समस्या सोडवणे हा देखील महत्त्वाचा उद्देश आहे. शासनाची कामे जनतेपर्यंत पोहोचवणे आणि पारदर्शक व जबाबदार प्रशासन निर्माण करणे.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्Types of Local Government Bodies)
१. ग्रामीण भागातील संस्था (73 वी घटना दुरुस्ती)
(अ) ग्रामपंचायत – गावपातळीवरील संस्था
(आ) पंचायत समिती – तालुकास्तरावरील संस्था
(इ) जिल्हा परिषद – जिल्हास्तरावरील संस्था
या तिन्ही संस्था मिळून ग्रामीण भागातील विकासात्मक कामे करतात. उदा. रस्ते बांधणी, पाणीपुरवठा, शाळा, आरोग्य केंद्र, शेतीविकास इत्यादी.
२. शहरी भागातील संस्था (74 वी घटना दुरुस्ती)
(अ) नगरपंचायत – लहान शहरी भागांसाठी
(आ) नगरपरिषद – मध्यम आकाराच्या शहरांसाठी
(इ) महानगरपालिका – मोठ्या शहरांसाठी
या संस्था शहरी भागातील नियोजन, स्वच्छता, रस्ते, मलनिस्सारण, प्रकाशव्यवस्था, नागरी सुविधा अशा जबाबदाऱ्या पार पाडतात.
नगरपरिषद म्हणजे काय? (What is a municipal council?)
मध्यम आकाराच्या शहरांसाठी स्थापन केलेली स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपरिषद आहे. उदाहरणार्थ नागपूर जिल्ह्यातील उमरेड, भंडारा जिल्ह्यातील तिरोरा, अकोला जिल्ह्यातील माळेगाव यांचा समावेश आहे.
नगरपंचायत म्हणजे काय? (What is a Nagar Panchayat?)
नगरपंचायत म्हणजे ग्रामीण भागातून हळूहळू शहरी होत असलेल्या भागासाठी स्थापन संस्था. जसे की, गावातून शहरात रूपांतर होणारे छोटे भाग — जसे की नव्याने वाढणारे छोटे बाजारपेठेचे केंद्रे यांचा समावेश आहे.
रचना आणि अधिकार
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोक थेट निवडणुकीद्वारे सदस्य निवडतात.
ग्रामपंचायतीसाठी सरपंच व सदस्य
नगरपरिषद व महानगरपालिकेसाठी नगरसेवक आणि महापौर
पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी सदस्य व अध्यक्ष
या संस्थांना स्थानिक कर वसुली, विकास आराखडा तयार करणे, पाणी व वीज पुरवठा, शिक्षण व आरोग्यसेवा पुरवणे यासारखे अधिकार आहेत.
उद्दिष्टे
स्थानिक पातळीवर लोकांचा सहभाग वाढवणे
लोकशाहीचे विकेंद्रीकरण घडवणे
नागरिकांना विकास प्रक्रियेत थेट सहभागी करणे
स्थानिक समस्या स्थानिक पातळीवर सोडवणे
पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन निर्माण करणे
स्थानिक स्वराज्य संस्था या भारतीय लोकशाहीच्या जिवंत नाडी आहेत. त्या लोकशाहीला फक्त कागदावर न ठेवता व्यवहारात आणतात. प्रत्येक गाव, शहर आणि जिल्हा स्वयंपूर्ण आणि प्रगत व्हावा, हेच त्यांचे ध्येय आहे. त्यामुळे या संस्थांचे बळकटीकरण म्हणजे देशाच्या विकासाला दिलेले खरे योगदान होय.
Shabdraj www.shabdraj.com