04/02/26
Breaking News

आगामी निवडणुका ताकदीने लढविणार : परभणीत शिवसेना व रिपब्लिकन सेनेद्वारे निर्धार

परभणी,दि 21 ः
परभणी महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता असूनही शहराचा विकास झालेला नाही. काँग्रेसने परभणीच्या विकासाला ओहोटी आणली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊन युतीचा झेंडा महानगरपालिकेवर फडकवेल असा विश्वास शिवसेना व रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्रात युतीची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सावली विश्रामगृह येथे शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकार्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संयुक्तरित्या आणि ताकदीने लढण्याचा निर्धार करण्यात आला. या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एकत्र येऊन शिवशक्ती भीम शक्ती एकत्र करून महानगरपालिकेवर युतीचा झेंडा फडकवतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
बैठकीस रिपब्लिकन सेनेचे राज्य संघटक भैय्यासाहेब भालेराव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे पाटील, परभणी विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपट्टे, महेंद्र सानके, रमेश साळवे, राजकुमार सूर्यवंशी, प्रीतम वाकळे, गंगाधर सपाटे, रामोजी ढाले, चंद्रकांत दुधमल, निलेश डुमणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, बैठकीनंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …