04/02/26
Breaking News

हिवाळी अधिवेशन केवळ ८ दिवस…तारीख जाहीर..

मुंबई,दि 03 ः
महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन यंदा नेहमीप्रमाणे नागपूरमध्ये होणार आहे मात्र हे अधिवेशन केवळ ८ दिवस चालणार असल्याची माहिती समोर आली आहे. अधिवेशनात अतिवृष्टी ते शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखे महत्त्वाचे मुद्दे गाजणार आहे. आज झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ८ ते १४ डिसेंबरदरम्यान हे अधिवेशन चालणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
विधानसभा अध्यक्षांनी पावसाळी अधिवेशना दरम्यान हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.अतिवृष्टीमधील नुकसानभरपाई आणि शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा गाजणार आहे. काही नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. मुद्द्यांच्या तीव्रतेमुळे हिवाळ्यात राजकीय वातावरण तापण्याची अपेक्षा आहे.या अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी, अतिवृष्टीतील भरपाई, शेतकरी आत्महत्या आणि इतर आणखी काही महत्त्वाचे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. दरम्यान मागील काही महिन्यांपूर्वी काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते यावरूनही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे त्यामुळे अधिवेशन तापणार आहे.

Check Also

नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी अखेरीस पूर्ण करण्याचे बंधन असल्याने निवडणूक …