09/05/26
Breaking News

अवैध दारूविक्रीच्या विरोधात महिला सरसावल्या

सेलू / प्रतिनिधी – तालुक्यातील मौजे हातनूर येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी गावातील महिला सरसावल्या असून त्यांनी याबाबत आज सेलू पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बोरसे साहेब यांची भेट घेतली व त्यांना याबाबत निवेदन दिले आहे.

 

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मौजे हातनूर येथे अवैध पद्धतीने देश व विदेशी दारू ची विक्री केली जात आहे. यामुळे मुले, तरुण, प्रौढ व्यसनाधीन होत आहे.त गावांमध्ये शिवीगाळ, मारहाण, कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिक विशेष करून महिला त्रस्त झाले आहेत. तरी ही अवैध दारू विक्री ताबडतोब बंद करावे नसता उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. यावेळी नर्मदा मुंडे, नंदूबाई कराळे, द्वारकाबाई आद्रट, सुनिता आहेरकर, सारिका कराळे, छाया कराळे, द्वारका कराळे, गोदा मुंडे, सागर कराळे, सीमा खवणे, सुलावती कातारे, जयसिंग शेळके, शाहू शिंदे, दत्तराव आंधळे, सुधाकर रोकडे उपस्थित होते.

Check Also

एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा वर्षपूर्ती ‘संकल्प सप्ताह’ साजरा

​हिंगोली,दि 07 ः हिंगोली जिल्ह्याला थॅलेसेमियामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. ‘एक पाऊल थॅलेसेमिया …