पाथरी प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. दि. 8 मार्च निमित्ताने आज 17 मार्च रोजी पाथरी येथील ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा करण्यात आला.मकर संक्रांतीच्या निमित्त “वाण नाहीतर, तर दान” या संकल्पनेतून सौ. मिराताई दादासाहेब टेंगसे (माजी सभापती, कृषी व पशुसंवर्धन, जि.प. परभणी) यांनी मागील 11 वर्षा पासून हा उपक्रम सुरू करून दरवर्षीप्रमाणे या वर्षी वृद्धाश्रमासाठी आर्थिक मदत व आवश्यक किराणा साहित्य भेट दिले. त्यांच्या या उपक्रमामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकताना दिसून आला.
या प्रसंगी माजी सभापती सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे,जिजाऊ ब्रिगेडच्या पाथरी तालुकाध्यक्ष शिवकण्या तुकाराम पौळ, शिक्षक सोमनाथ डोंगरे सर, पंकज बिराजदार सर, मराठा सेवक अक्षय कॉम्प्युटर्स चे संचालक तुकाराम पौळ सर यांची उपस्थिती लाभली. तसेच वृद्धांना आपल्या घरच्यांसारखे प्रेमाने सांभाळणाऱ्या गीताताई सोगे यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांशी सौ.मिराताई यांनी वृद्धांशी संवाद साधत त्यांना मानसिक आधार दिला. अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमुळे समाजात सेवा, सहकार्य आणि माणुसकीची भावना अधिक दृढ करण्याचे आव्हाहन त्यांनी केले.
ओंकार वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी या उपक्रमाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. महिला दिनानिमित्त साजरा करण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Shabdraj www.shabdraj.com