पुर्णा (सुशीलकुमार दळवी)
तालुक्यातील महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील महत्त्वाचे असलेले ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि मंडळ अधिकारी आज पासून सोमवार दि.15. संपावर गेले आहेत. नागरिकांना तातडीने ऑनलाइन सुविधा मिळण्यासाठी लॅपटॉप आणि इतर संबंधित साधनसामग्री तातडीने पुरवठा करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र. (डीएसएससी) प्रशासनाकडे जमा करून संप पुकारला आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या क्षेत्रीय स्तरावरील सर्व कामकाज ठप्प झाले आहे.
तलाठी संघाने मागण्यांचे निवेदन संबंधित तहसीलदारांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की मागील.10. वर्षापासून ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि मंडळ अधिकारी यांना लॅपटॉप आणि इतर साधनसामग्री मिळालेली नाही. त्यामुळे नागरिकांना द्यावयाचे सातबारा.8.अ. फेरफार नक्कल आधी सेवा देण्यास अडचणीचा सामना करावा लागत आहे. संगणकीय साहित्याचे आयुर्मान शासन निर्णयानुसार.5. वर्ष असल्याचे निश्चित केले होते. मात्र.10. वर्षाचा कालावधी उलटनही आणि ही उपकरणे पूर्णता कालबाहा नादुरुस्त आणि निकृष्ट अवस्थेत असल्याने नागरिकांना .ई.फेरफार.ई. हक्क.ई. पिकपाहणी.ई. पंचनामा यासारख्या सुधारित प्रणालीवर काम करणे व्यवहारीकदृष्ट्या शक्य होत नाही. ऑनलाइन प्रणालीतील नोंद घेणे. प्रस्ताव मंजूर करणे या आणि अशा आवश्यक सेवा वेळेत देणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत.ई. शासन प्रणालीवर शासनाच्या विश्वासार्हतेलाही तडा पोहोचतो.
परिणामी कर्मचारी वर्गात या कालबाहा आणि नादुरुस्त उपकरणांवर काम करणे म्हणजे गंजलेल्या तलवारीने लढाई लढण्यासारखे असे नमूद करत कर्मचाऱ्यांमध्ये असहाय्यता मानसिकता आणि शासनाविषयी तीव्र असंतोष निर्माण झाला आहे तसेच नवीन पदभरती करण्यात आलेल्या.3. हजार ग्राम महसूल अधिकाऱ्यांना. (तलाठी) सहा सात महिने एवढा कालावधी उलटूनही अद्याप संगणकीय साहित्य उपलब्ध करण्यात आले नाहीत. त्यामुळे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांना बाधा पोहोचत आहे. शासनाच्या गव्हर्मेंट ई मार्केट प्लस (जीईएस), या पोर्टलवर खरेदी शासन स्तरावर मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया मात्र अनेक महिन्यापासून रखडलेली आहे. याबाबत जमाबंदी आयुक्तांना संघटनेचे पदाधिकारी यांनी भेट दिली असता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष लॅपटॉप आणि इतर संगणकीय साधनसामग्री वाटप करण्यात येईल असे तोंडी आश्वासन देण्यात आले होते. मात्र ते अजूनही पूर्ण न करण्यात आल्याने संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात येत आहे.
या निवेदनावर महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे तालुका अध्यक्ष के.पी. शिंदे, कुलकर्णी, राऊत, आदीच्या तलाठ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत..
Shabdraj www.shabdraj.com