24/03/26
Breaking News

राज्य चाईल्ड व मिनी तलवारबाजी क्रीडा स्पर्धेसाठी परभणीचा संघ रवाना

सेलू (प्रतिनिधी )
छ. संभाजीनगर येथील राज्य चाईल्ड व मिनी तलवारबाजी क्रीडा स्पर्धा साठी परभणी संघ रवाना झाले असून या संघात येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था ,प्रशिक्षण केंद्रातील ७ खेळाडूंचा समावेश आहे .
महाराष्ट्र तलवारबाजी संघटना व छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दहा (चाइल्ड)वर्षे खालील व बारा वर्ष (मिनी)स्पर्धेचे आयोजन दि. 26 ते 29 जून दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धे मध्ये परभणी जिल्हा तलवारबाजी असोसिएशन वतीने सहभागी होणार आहे. या संघात चि.शरद भूमकर , कु. ईश्वरी डोंबे,कु.ईश्वरी गोरे, अर्णव डख ,अभिनव काष्टे,तेज चव्हाण, स्वयम लव्हाळे.आदी चा समावेश आहे.
या संघाला संजय भूमकर व जिजाभाऊ डख मार्गदर्शन करणार आहे या संघाला संघटनेचे अध्यक्ष ॲड. दीपकराव देशमुख जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. पांडुरंग रनमाळ, मुख्याध्यापक संतोष पाटील,उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, शंकर बोधनापोड, गणेश माळवे , प्रशांत नाईक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Check Also

ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा

पाथरी प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. …