हिंगोली,ता 27 ः हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करत अवैध दारु विक्री विरोधात कारवाई करत 28 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्छाटन करण्यासाठी डॉ नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या करून अवैध धंद्यांवर कठोर प्रहार करीत आहेत.परंतु डॉ. नीलाभ रोहन यांनी अचानकपणे सर्व ठाणेदाराला सूचना दिली व एकाच वेळी पूर्ण जिल्ह्यात अवैध दारू विक्री विरोधात छापेमारी करण्याचे आदेश दिले त्यावरून हिंगोली जिल्ह्यातील सर्व ठाणेदार, उपविभागीय पोलीस अधिकारी पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक असे एकाच वेळी सर्व जिल्ह्यात छापेमारी करून तब्बल 28 जनाविरोधात अवैध दारू विक्री संदर्भाने गुन्हे दाखल करून कार्यवाही करण्यात आलेली आहे.
पोलीस कार्यवाहीचा कोणताही सुगावा न लागता अचानक पडलेल्या छाप्यामुळे अवैध दारू विक्रेत्याचे कंबरडे मोडले आहे. अवैध दारू विक्रीतून उत्पन्नापेक्षा पोलिसांच्या लगातार छापल्यामुळे व मुद्देमाल जप्तीमुळे खर्च जास्त होत असल्याने अनेक दारू विक्रेत्यांनी गाशा गुंडाळला आहे.
सदरची कार्यवाही ही डॉ. नीलाभ रोहन पोलीस अधीक्षक हिंगोली, श्री कमलेश मीना अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली, श्री राजकुमार केंद्रे , उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत, श्री कुंदन कुमार वाघमारे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली शहर, श्री मयूर रसाळ प्र पोलीस उप अधीक्षक हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यातील सर्व ठाणेदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी केली आहे.
यानंतर सुद्धा अवैध दारू विक्री विरोधात कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.
Shabdraj www.shabdraj.com