राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूक होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेसह या महापालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
खालील तक्त्यात पाहा निवडणुकीचा कार्यक्रम
| उमेदवारी दाखल | 23 ते 30 डिसेंबर |
| उमेदवार अर्जांची छाननी | 31 डिसेंबर |
| उमेदवारी मागे घेण्याची मुदत | 2 जानेवारी 2026 |
| निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी | 3 जानेवारी 2026 |
| मतदान | 15 जानेवारी 2026 |
| मतमोजणी | 16 जानेवारी 2026 |
Shabdraj www.shabdraj.com