सेलू ( प्रतिनिधी )
श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत येथील महेशनगर मधील श्री स्वामी समर्थ व बाल संस्कार केंद्राच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये ९ते १५ एप्रिल दरम्यान
गुरु चरित्र पारायण व नाम जप यज्ञाचे आयोजन करण्यात आले . ७ एप्रिल मंगळवार रोजी श्रीची पालखी काढून नगर प्रदर्शना करण्यात आली व सप्ताचे निमंत्रण दिले तसेच ९ ते १५ एप्रिल दरम्यान गुरु चरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता .यामध्ये १४७ सेवेकऱ्यांनी सहभाग घेतला . तर याग , नित्य सेवा , स्वामी समर्थ महाराज यांचा अखंड जप म्हणजे प्रहर सेवा दररोज सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत सर्व पुरुष व महिला सेवेकऱ्यांनी आपली सेवा दिली .
महिला प्रहर चे नियोजन योगीता फंड व शुभांगी झुटे तर पुरुष नियोजन सुनील गायकवाड व शिवाजीराव हरकळ यांनी केले .
१० एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले .
यासाठी डॉ संजय हरबडे , गणेश काटकर, अशोक शेलार , गतानन डोंबे आदि उपस्थित होते.
प्रशांतसिंह रघुवंशी , सुनील गायकवाड , कार्तिक दळवे यांनी रक्तदान करून शिबिराचे उदघाटन केले .
स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित गुरु चारित्र पारायण वाचकांना १६० वृक्ष वाटप कैलास भोसले यांच्या वतिने करण्यात आले तर या सप्ताहात दररोज स्वामी समर्थ महाराज यांचा अभिषेक करण्यात आला .
सप्ताहाची सांगता महाप्रसादाने झाली
या सप्ताहाच्या यशस्वी तेसाठी
मुख्य यजमान भगवान जाधव , सुजाता बोकेफोड,
कार्तिक दळवे , सुमीत शर्मा , नागेश कुलकर्णी,संजय गव्हाडे , परमेश्वर तमखाने सुनील गायलवाड, धनंजय निलवर्ण, नितीन केवारे , कृष्णा वायाळ,
सुनीता बोकेफोड , रत्नप्रभा मगर , सरस्वती गात , शंकर गात , उधव झिजान आदींनी परिश्रम घेतले
Shabdraj www.shabdraj.com