सेलू ( प्रतिनिधी )
शहरातील रायगड कॉर्नर या ठिकाणी दि १६ एप्रिल रोजी पहाटे पाच च्या सुमारास अवैधरित्या गोवंश जनावरे वाहतूक करीत असताना एकूण सात पिकप आणि एक आयशर अशी वाहने मिळून आल्याने त्यावरील चालकांविरोधात सेलू पोलीस स्टेशन येथे एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये एकूण अकरा आरोपी असून सदर गुन्ह्यामध्ये बैल जातीचे गोवंश ४५ जनावरे जप्त करण्यात आली आहेत.
परतूर तालुक्यातील पारडगाव या ठिकाणाहून सदरची वाहने जनावरे कोंबून त्यांना यातना होईल अशा पद्धतीने भरून मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करून त्यांची वाहतूक करीत असताना आढळून आली .
शहरातील रायगड कॉर्नर या ठिकाणी सदर वाहने मिळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यवाहीमध्ये वाहने व गोवंश जनावरे असा एकंदरीत ५५ लाख रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे .
सदरच्या कार्यवाहीतील सर्व गोवंश जनावरे इटोली तालुका जिंतूर येथील गो शाळेत पाठवण्यात आले आहेत.
माननीय पोलीस अधीक्षक,परभणी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राऊत पोलीस हवालदार जाधव, तेलंगे , कोपनर रासकटला ,साठे यांनी केली असून पुढील तपास पोलीस हवालदार तेलंगे, शेख व राठोड हे करीत आहेत
Shabdraj www.shabdraj.com